महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजाराने गाठला नवा उच्चांक; ओलांडला ४६,००० चा टप्पा - शेअर बाजार अपडेट न्यूज

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दुपारी १ वाजून ५५ मिनिटाला मागील सत्राच्या तुलनेत ४२१.९२ अंशाने वधारून ४६,०३०.४३ वर पोहोचला. तर एनएसईमध्ये निफ्टी५० मध्ये निर्देशांकाने १३,५१७.२५ हा नवा उच्चांक गाठला आहे.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Dec 9, 2020, 3:24 PM IST

मुंबई- शेअर बाजाराने आज दुपारी निर्देशांकाचा ४६,००० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदाच हा सर्वोच्च निर्देशांक गाठला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दुपारी १ वाजून ५५ मिनिटाला मागील सत्राच्या तुलनेत ४२१.९२ अंशाने वधारून ४६,०३०.४३ वर पोहोचला. तर एनएसईमध्ये निफ्टी५० मध्ये निर्देशांकाने १३,५१७.२५ हा नवा उच्चांक गाठला आहे.

हेही वाचा-भारत बंददरम्यान विमान तिकिट रद्द केल्यास लागू होणार नाही शुल्क

निफ्टीचा निर्देशांक मागील सत्राच्या तुलनेत ११६.८० अंशाने वधारून १३,५०९.७५ वर पोहोचला. वित्तीय कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली. कोरोनावर लस बाजारात येईल, असे सध्या सकारात्मक वातावरण आहे. या स्थितीमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.

दरम्यान, आरबीआयने रेपो दर 'जैसे थे' ठेवल्यानंतर शेअर बाजाराने ४५,००० चा टप्पा पहिल्यांदाच ४ डिसेंबरला ओलांडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details