महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने ओलांडला ४० हजारांचा टप्पा; 'या' कंपन्या तेजीत

मुंबई शेअर बाजारात तेजी निर्माण झाली आहे. आयटी कंपन्यांचे शेअर वधारल्याने ही तेजी निर्माण झाली आहे.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Oct 8, 2020, 12:09 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ४०० अंशाने वधारून ४० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आयटी कंपन्यांचे शेअर वाढल्याने शेअर बाजारात तेजी निर्माण झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी साडेनऊ वाजता ४४९.१९ अंशाने वधारून ४०,३२८.१४ वर पोहोचला. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३९,८७८.९५ वर स्थिरावला होता. निफ्टीचा निर्देशांक १२१.६५ अंशाने वधारून ११,८६०.५० वर पोहोचला.

दरम्यान, टीसीएसच्या संचालक मंडळाने १६ हजार कोटींचे बायबॅक शेअर खरेदी करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर विप्रोनेही बायबॅक शेअर घेण्यावर संचालक मंडळ विचार करणार असल्याचे सांगितले. आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये बाजारात तेजी निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details