मुंबई - इराण-अमेरिकेमधील तणावाच्या स्थितीचे भारतीय भांडवली बाजारावर प्रतिकूल पडसाद उमटले आहेत. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ५३० अंशाने कोसळला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर २ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७० डॉलर झाले आहेत.
मुंबई शेअर बाजार सकाळी १० वाजता ४४२.३१ अंशाने घसरून ४१,०२२.३० वर पोहोचला. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना ४१,४६४ वर स्थिरावला होता. सोन्याचा दर शुक्रवारी प्रति तोळा ४१,३३० रुपये झाला होते. हा आजपर्यंतचा सोन्याचा सर्वोच्च दर आहे. निफ्टीही १ टक्क्यांनी घसरून १२,०८२.९५ वर पोहोचला.