महाराष्ट्र

maharashtra

शेअर बाजार निर्देशांकात ३३४ अंशाची घसरण; बँकासह ऑटो कंपन्यांना फटका

By

Published : Dec 6, 2019, 5:44 PM IST

मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिसने येस बँकेचे पतमानांकन कमी केले आहे. त्याचा परिणाम म्हणून येस बँकेचे शेअर सुमारे १० टक्क्यांनी घसरले आहेत.  स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा व एचडीएफसीचे शेअर सर्वात अधिक घसरले.

Share Market
संग्रहित - शेअर बाजार

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजार निर्देशांकात ३३४ अंशाची घसरण झाली. तर निफ्टीचा निर्देशांक १२,०० हून खाली आला. बँकांसह वाहन कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने तिमाहीत पतधोरणात अनेपेक्षितपणे रेपो दर हा 'जैसे थे' ठेवण्याचा गुरुवारी निर्णय घेतला. तर आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर हा पूर्वीच्या अंदाजाहून कमी राहील, असे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

हेही वाचा-बोगस कागदपत्रांचा 'असा'ही वापर; भामट्यांनी सरकारला लावला १० हजार कोटींचा चूना

मुंबई शेअर बाजार ३३४.४४ अंशाने घसरून ४०,४४५.१५ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ९६.९० अंशाने घसरून ११,९२१.५० वर स्थिरावला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिसने येस बँकेचे पतमानांकन कमी केले आहे. त्याचा परिणाम म्हणून येस बँकेचे शेअर सुमारे १० टक्क्यांनी घसरले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा व एचडीएफसीचे शेअर सर्वात अधिक घसरले. तर कोटक बँक, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, टीसीएस, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेचे शेअर हे वधारले. शेअर बाजारातील ३० कंपन्यांच्या अधिसूचित निर्देशांकांवर २३ कंपन्यांचे शेअर घसरले. तर ७ कंपन्यांचे शेअर वधारले. केवळ दूरसंचार निर्देशांकावरील कंपन्यांचे शेअर वधारले.

हेही वाचा-मारुती सुझुकी ६३ हजार ४९३ वाहने परत मागविणार; 'हे' आहे कारण

ABOUT THE AUTHOR

...view details