मुंबई- शेअर बाजार 40,301.16 या विक्रमी निर्देशांकावर पोहोचून बंद झाला. तर दिवसभरात शेअर बाजाराने निर्देशांकाची 40,483.21 ही आजपर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली होती. विदेशी गुंतवणूकदार संस्थांची गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचावरील अनुकूल स्थितीने शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे.
शेअर बाजार मागील सत्राच्या तुलनेत 136.93 अंशाने वधारून 40,301.96 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा 52.25 अंशाने वधारून 11,942.85 वर पोहोचला.
हेही वाचा-दुष्काळासह मंदीच्या फेऱ्यातील वाहन उद्योगाला सणांमधून मिळाली 'संजीवनी'
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, टीसीएस आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरला बाजारामध्ये मोठी मागणी असल्याचे दिसून आले. इन्फोसिस, वेदांत, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एसबीआय व एचसीएल टेक या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. मारुती, येस बँक, टाटा मोटर्स आणि हिंदुस्थान युनीलिव्हरचे शेअर घसरले.
हेही वाचा-आरसीईपीच्या प्रस्तावित करारावर सदस्य देशांकडून संयुक्त निवेदन जाहीर होण्याची शक्यता
अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी करार होत असल्याने आशिया खंडातील बहुतेक शेअर मार्केटमध्ये निर्देशांक वधारला आहे.