मुंबई -केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला जाहीर झाल्यापासून सुरू झालेली शेअर बाजाराची घौडदौड आजही कायम राहिला आहे. शेअर बाजाराने पहिल्यांदाच दिवसाखेर ५०,००० चा टप्पा ओलांडला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४५८ अंशाने वधारून ५०,२५५ वर स्थिरावला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक १४२ अंशाने वधारून १४,७८९ वर स्थिरावला आहे. शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीनेही उच्चांक नोंदविला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून निफ्टीचा निर्देशांक २,३१५ अंशाने वधारला आहे.
पहिल्यांदाच दिवसाखेर ओलांडला ५०,००० चा टप्पा हेही वाचा-सोन्याच्या दरातील घसरणीनंतर चांदी प्रति किलो १,९५५ रुपयांनी स्वस्त
ही आहेत शेअर बाजार निर्देशांक वधारण्याची कारणे-
- झेन मनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सतीश कनथेटी म्हणाले की शेअर बाजाराने महत्त्वाचा मैलाचा दगड गाठला आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर शेअर बाजार वधारला आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने गुंतवणूक आणि वृद्धीदरावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शेअर बाजार सकारात्मकतेने प्रतिसाद दिला आहे.
- जागतिक बाजाराबरोबर देशातील बाजाराची स्थितीही सकारात्मक आहे. त्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाल्याचे सतीश कनथेटी यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा-राज्यांच्या जीएसटी कर संकलनात वाढ होण्याची शक्यता
भारतीय शेअर बाजाराने इतिहासात पहिल्यांदाच २१ जानेवारीला शेअर बाजाराने ५०,००० चा टप्पा ओलांडला होता गेल्या शंभर वर्षांमध्ये नसेल असा अर्थसंकल्प आम्ही यावेळेस सादर करू, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले होते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळे शेअर बाजारांमध्ये उच्चांक पाहायला मिळालेला होता.