महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 22, 2021, 9:32 AM IST

Updated : Dec 22, 2021, 10:02 AM IST

ETV Bharat / business

बचत करणे अथवा कर्ज घेणे - गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला

शेअर बाजारातमध्ये गुंतवणुक प्रचंड वाढली आहे आणि अनेकांना त्याचा लाभही मिळतो आहे. हे पाहून भरपूर जण बाजारात गुंतवणूक करु इच्छित आहेत. तर, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ते जास्त पैसे मिळण्याच्या आशेने बाजारात गुंतवणुक करण्यासाठी कर्ज घेत आहे. याबाबत शेअर बाजारातील तज्ज्ञ तुम्मा बलराज म्हणतात, यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. यासंदर्भात काही लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निरासन केले आहे.

Savings vs Borrowing: Which is better investment option
बचत करणे अथवा कर्ज घेणे - गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला

अनेकांकडे पुरेसा पैसा असतो आणि ते सतत आपली संपत्ती वाढवण्यासाठी चांगले पर्याय शोधत असतात. शेअर बाजार, शेअर ब्रोकर्सचा सल्ला घेऊन बाजारात गुंतवणुक केली जाते. मात्र, त्यालाही मर्यादा आहेत. किंबहूना, अलीकडे शेअर बाजारातमध्ये गुंतवणुक प्रचंड वाढली आहे आणि अनेकांना त्याचा लाभही मिळतो आहे. हे पाहून भरपूर जण बाजारात गुंतवणूक करु इच्छित आहेत. तर, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ते जास्त पैसे मिळण्याच्या आशेने बाजारात गुंतवणुक करण्यासाठी कर्ज घेत आहे. याबाबत शेअर बाजारातील तज्ज्ञ तुम्मा बलराज म्हणतात, यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. यासंदर्भात काही लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या शंकांचे निरासन केले आहे.

1) नरेश म्हणतो की, "मी 24 वर्षाचा आहे. मला नुकतीच नोकरी मिळाली असून, 75 लाख रुपयांची टर्म पॉलिसी घ्यायची आहे. तसेच, दरमहा 10,000 रुपये गुंतवण्याचा विचार आहे. पुढील 15 वर्षासाठी माझी आर्थिक योजना काय असावी.

- तुमच्यावर अवलंबुन असलेल्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी टर्म पॉलिसी घेणे चांगले आहे. पॉलिसीची रक्कम तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 12 पट असल्याची खात्री करा. ही रक्कम विभाजीत करत पैशांचा चांगला इतिहास असणाऱ्या कंपन्याना द्या. तसेच, वैयक्तिक अपघात विमा आणि अपंगत्व विमा पॉलिसी निवडा. तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी नसल्यास, तुम्ही ती घ्यावी. श्रेणीबद्ध गुंतवणूक योजनेद्वारे (SIP) वैविध्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये रु. 10,000 गुंतवा. यामध्ये धोका आहे मात्र दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही 15 वर्षांसाठी दरमहा 10,000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 12 टक्के अंदाजे 44,73,565 रुपये मिळू शकतात. त्यामुळे एकीकडे तुमचे उत्पन्न वाढत असताना तुमची गुंतवणूक वाढवत रहा.

2) वैयक्तिक कर्ज घेऊन शेअर्स मध्ये गुंतवणुक करायची आहे. पण त्या कर्जावरील व्याज प्रती वर्षी 13 टक्के आहे. जर शेअर बाजारात गुंतवणुक केली तर आपल्याला जास्त परतावा मिळेल हे खरे आहे का! जर असेल कोणती खबरदारी घ्यावी, असा सवाल महिपाल यांनी केला आहे.

- गेल्या वर्षभरात शेअर बाजाराची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. या काळात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे की शेअर बाजारात नफ्यासोबत तोटाही होतो. गुंतवणुकीसाठी नेहमी स्वतःचे पैसे वापरा. शिवाय कर्ज घेऊन गुंतवणूक करणे योग्य नाही. जेव्हा तुम्ही वैयक्तिक कर्ज घेता तेव्हा तुम्हाला व्याज भरावे लागते. एकूण व्याजदर 13 टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे कर्ज घेण्याऐवजी आणि गुंतवणूक करण्याऐवजी, तुम्ही कर्जासाठी भरलेला EMI लक्षात ठेवा आणि ती रक्कम मासिक आधारावर इक्विटी म्युच्युअल फंडांना द्या. जेव्हा तुम्हाला पाच वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक चालू ठेवायची असेल तेव्हाच शेअर बाजारात गुंतवणूक करा.

3) श्वेता म्हणते की, आमचे मुल सहा वर्षांचे आहे आणि आम्हाला त्याच्या नावाने PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायची आहे. आम्ही दरमहा 8,000 रुपये देऊ शकतो यासाठी आम्हाला गुंतवणुकीचे पर्याय सुचवा.

- सार्वजनिक भविष्य निधी आणि सुकन्या समृध्दी योजना या दोन्ही योजना सुरक्षित असून 8000 रुपयांपैकी 5,000 रुपये यामध्ये गुंतवा. राहिलेली 3000 रुपयांची रक्कम हायब्रीड इक्विटी फंडात टाका. सुकन्या समृध्दी योजनेला सध्या 7.6 टक्के व्याज मिळत आहे. 15 वर्षे या दोन्ही याोंजनांत 8000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला सरासरी 10 टक्के व्याजदरासह 30,50,158 रुपये मिळतील.

4) दोन महिन्यांत निवृत्त होणारे कृष्णा म्हणत आहेत, मला उत्पन्न वाढवण्यासाठी प्रत्येक महिन्याला गुंतवणुक करायची आहे. त्यासाठी मी बँकेच्या मुदत ठेवींऐवजी लिक्विड फंडात गुंतवणूक करू शकतो का?

- सद्य स्थितीला मुदत ठेवींवरील परतावा हा लिक्विड फंडांपेक्षा जास्त आहे. तुम्ही सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजना किंवा पंतप्रधान वय वंदना योजनेतही जमा करू शकता. त्यात जास्तीत जास्त 15 लाख गुंतवले जाते. तसेच, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची माहिती देखील तुम्ही घेऊ शकता.

Last Updated : Dec 22, 2021, 10:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details