महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

विक्रम संवत २०७६ वर्ष हे अधिक प्रकाशमय असेल - बाजार विश्लेषक - Samvat 2076

येत्या शुक्रवारी फ्युचर शेअरची मुदत संपत आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी खूप आतिषबाजी नाही. पण पणत्यांच्या मुबलक प्रकाशाप्रमाणे शेअर बाजारात स्थिती अपेक्षित आहे.

संग्रहित - शेअर बाजार

By

Published : Oct 28, 2019, 3:19 PM IST

मुंबई - गेल्या आठवडा शेअर बाजारासाठी नुकसानीचा ठरला आहे. याचवेळी हिंदू कालमापनेप्रमाणे विक्रम संवत २०७५ वर्ष संपले आहे. मुहुर्त ट्रेडिंगवर शेअर बाजार 39,397.37 वर खुला झाला. त्यानंतर निर्देशांक 223.14 अंशाने वधारून बंद झाला. शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांक 39,058 वर बंद झाला.

शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांक हा 240.32 अंशाने घसरून 39,058.06 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक 77.95 अंशाने घसरून 11,583.90 वर पोहोचला. बीएसई 100, बीएसई 200, बीएसई 500 हा 0.75 टक्के, 0.61 टक्के आणि 0.56 टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅपचे 0.54 टक्क्यांची घसरण झाली. तर बीएसई स्मॉलकॅप हा 0.20 टक्क्यांनी वधारला. आठवडाभरातील दोन दिवस शेअर बाजार वधारला. तर दोन दिवस शेअर बाजार घसरला. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असल्याने सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी होती. रुपया हा डॉलरच्या तुलनेत 26 पैशांनी वधारून 70.88 वर पोहोचला.

विक्रमसंवत 2075 वर्षात शेअर बाजार हा 3,820.29 अंशाने अथवा 10.84 टक्क्यांनी वधारून 39,058.06 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा 985.5 अंशाने वधारून 11,583.90 वर पोहोचला.

हेही वाचा-ग्राहकाची वाहन खरेदीची हौस भारी; चार पोत्यांमधील नाणी मोजताना कामगारांची दमछाक


हे वर्ष शेअर बाजारासाठी कठीण गेले आहे. बागलकोल हल्ल्यानंतर करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक आणि एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर शेअर बाजारात सुधारणा झाल्याचे दिसून आले. शेअर बाजारावर अमेरिका-चीनचे व्यापारी युद्ध, मंदावलेली अर्थव्यवस्थेचा परिणाम झाला. शेअर बाजाराने मे महिन्यात सर्वोच्च निर्देशांक नोंदविला.

रविवारीपासून (27ऑक्टोबर) विक्रमसंवतची सुरुवात झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा शेअर बाजार निर्देशांक चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मंदावलेली अर्थव्यवस्था दोन्ही तिमाहीत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच अर्थव्यवस्थेचाला चालना देण्यासाठी काही आर्थिक सुधारणा घोषित केल्या जातील, अशी विविध क्षेत्रांना अपेक्षा आहे.

हेही वाचा-अभिनेत्री मौनी रॉयच्या हस्ते शेअर मार्केटमध्ये लक्ष्मीपूजन


ऑईल आणि गॅस तसेच बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (बीएफएसआय) स्पेसमध्ये तातडीने सुधारणा होवू शकली असती. मात्र, बीपीसीएलमधील निर्गुंतवणुकीने ऑईल आणि गॅस कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. तसेच डीएचएफएल, आयएलएफएस, येस बँक आणि इंडियाबुल्स ग्रुप या कंपन्यांमधील काही अनुचित प्रकारांमुळे बीएफएसआयवर स्पेस निर्देशांकावर परिणाम झाला. देशातील गुंतवणूकदारांनी विमा क्षेत्राकडे फारसे लक्ष दिलेले नाही. येत्या काळात विमा क्षेत्रामधील गुंतवणूक वाढू शकते. आयुष्यमान भारत या योजनेमुळे परवडणाऱ्या विम्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.


सार्वजनिक कंपन्यांचे शेअर वाढल्याचे दिसून आले. विशेषत: आयआरसीटीसी 14 ऑक्टोबरला शेअर बाजारात सूचिबद्ध होताना शेअरच्या किमती सुमारे 181 टक्क्यांनी वाढल्या होत्या. येत्या शुक्रवारी फ्युचर शेअरची मुदत संपत आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी खूप आतिषबाजी नाही. पण पणत्यांच्या मुबलक प्रकाशाप्रमाणे शेअर बाजारात स्थिती अपेक्षित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details