नवी दिल्ली - सॅमसंगने शुक्रवारी गॅलेक्सी एस 20 एफसी स्मार्टफोनमधील 256 जीबी व्हेरिएंट (फॅन एडिशन) लॉन्च केला आहे. याची किंमत 53,999 रुपये आहे.
सॅमसंग एस20 एफई (8जीबी-256जीबी) च्या क्लाउड नेवी रंगातील स्मार्टफोनची प्री-बुकिंग 17 ऑक्टोबरपासून सॅमसंग डॉट कॉमवर उपलब्ध केला जाणार आहे. त्याबरोबरच इतरही ऑफलाइन, ऑनलाइन रिटेल स्टोर्सवर हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. हा २८ ऑक्टोबर पर्यंत ग्राहकांच्या हातात मिळेल.