महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सॅमसंगने शाओमीला टाकले मागे; देशातील मोबाईलच्या बाजारपेठेत ठरली अव्वल - Samsung in mobile phone market

सॅमसंगचा देशातील मोबाईलच्या बाजारपेठेत 24 टक्के हिस्सा आहे. तर त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक शाओमी, विवोचा असल्याचे आयडीसी इंडियाने म्हटले आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Aug 7, 2020, 5:51 PM IST

नवी दिल्ली– दक्षिण कोरियन सॅमसंगने चीनच्या शाओमीला देशातील मोबाईलच्या बाजारपेठेत मागे टाकले आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंगचा मोबाईलच्या बाजारपेठेत पहिल्या क्रमांकाचा हिस्सा राहिला आहे.

सॅमसंगचा देशातील मोबाईलच्या बाजारपेठेत 24 टक्के हिस्सा आहे. तर त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक शाओमी, विवोचा असल्याचे आयडीसी इंडियाने म्हटले आहे.

  • मध्यम श्रेणीतील मोबाईलचा हिस्सा गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा 48.4 टक्क्यांनी घसरला आहे. यामध्ये सॅमसंग गॅलक्सी ए51 आणि ए71 आणि विवो व्ही19, अपल आयफोन एसई(2020) आणि वनप्ल्स 7टीचा समावेश आहे.
  • स्मार्टफोनच्या श्रेणीत सॅमसंगने विवोला मागे टाकले आहे. गॅलक्सी एम21 हे देशात आयात होणारे पहिल्या पाचमधील स्मार्टफोनचे मॉडेल ठरले आहे. गॅलेक्सीच्या एम श्रेणीमधील बहुतांश मॉडेल ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
  • सॅमसंग हे मोबाईलच्या ऑनलाईन विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर ठरले आहे. दुसऱ्या तिमाहीमधील ऑनलाईन मोबाईलच्या विक्रीत सॅमसंगचा 22.8 टक्के हिस्सा राहिला आहे.
  • दुसऱ्या तिमाहीत पहिल्या पाच मॉडेलमध्ये शाओमीचे चार म़ॉडेल ठरले आहेत. यामध्ये रेडमी नोट 8ए ड्युअल, नोट 8, नोट 9 प्रो आणि रेडमी 8 मॉडेलचा समावेश आहे. या मोबाईलचा एकूण बाजारपेठेत 21.8 टक्के हिस्सा राहिला आहे.

शाओमीने भागीदारांसाठी एमआय कॉमर्स सुरू केले आहे. शाओमीचा मोबाईलच्या बाजारपेठेत चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये 42.3 टक्के हिस्सा राहिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details