मुंबई - कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय चलनाला मोठा फटका बसला आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत आज ६८ पैशांनी घसरण झाली आहे.
कच्च्या तेलाचे दर वाढल्याने रुपया गडगडला! डॉलरच्या तुलनेत ६८ पैशांनी घसरण - इंटरबँक फॉरेन एक्सचेंज
सौदीमधील दोन तेल प्रकल्पावर बंडखोरांनी ड्रोनच्या सहाय्याने शनिवारी हल्ले केले. भारत हा कच्च्या तेलाचा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ग्राहक देश असल्याने त्याचा तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंजमध्ये सकाळच्या सत्रात घसरण होवून डॉलरच्या तुलनेत रुपया ७१.५४ वर पोहोचला. दिवसअखेर डॉलरची तुलनेत ६८ पैशांची घसरण होवून रुपया ७१.६० वर स्थिरावला. वॅलिडस वेल्थचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश चेरुवू म्हणाले, भारतीय रुपया तसेच इतर चलन हे कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्चाने भारताला मोठी वित्तीय तूट आणि महागाईला तोंड द्यावे लागते. शुक्रवारी रुपयाचे डॉलरच्या तुलनेत ७०.९२ एवढे मूल्य होते.