मुंबई– गेल्या तीन महिन्यांत रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक आज मजबूत झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 56 पैशांनी वधारले आहे.
कोरोनाची लस निर्माण होण्याच्या शक्येते देशातील शेअर बाजारात सकारात्मकता निर्माण झाली आहे. फायझर कंपनीच्या लसीचे परिणाम हे गुंतवणूकदारांना उत्साहित करणारे आहेत. बाजार खुला होताना डॉलरच्या तुलनेत एका रुपयाचे मूल्य 75.51 रुपये झाले होते. तर बाजार बंद होताना डॉलरच्या तुलनेत रुपया हा 75.4 मूल्यावर पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे देवार्ष वकील म्हणाले, 23 एप्रिलनंतर रुपया हा आज एका दिवसात सर्वाधिक वधारला आहे.