मुंबई - रुपया सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत वधारल्यानंतर दिवसाखेर ५० पैशांनी घसरला आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ७२.७४ वर पोहोचले आहे. कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर रुपयाची घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा ३९१ रुपयांनी वधारून ४२,६१६ रुपये झाला आहे.
सलग दुसऱ्या सत्रात रुपयाची घसरण झाली आहे. दोन्ही सत्रात एकूण ११३ पैशांनी रुपयाची घसरण झाली आहे. दिवसभरात रुपयाचे मूल्य हे अस्थिर राहिल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख व्ही. के. शर्मा यांनी सांगितले. आशियामध्ये फक्त भारतीय चलनाचीच घसरण झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-वधारलेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक सायंकाळी आपटला; कोरोनाचा परिणाम