महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

डॉलरच्या तुलनेत रुपयाची दोन महिन्यातील सर्वाधिक घसरण; 'हे' आहे कारण - रुपया मूल्य न्यूज

सलग चौथ्यादिवशी रुपयाच्या मूल्यात आज घसरण झाली आहे. आठवडाभरात रुपयाच्या मूल्यात ४९ पैशांची घसरण झाली आहे.

रुपया
रुपया

By

Published : Oct 29, 2020, 6:42 PM IST

मुंबई- रुपयाची डॉलरच्या तुलनेत गेल्या दोन महिन्यातील सर्वात मोठी आज घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत २३ पैशांनी घसरले आहे. शेअर बाजारातील घसरण, बळकट झालेला डॉलर आणि कोरोनाची अमेरिकेसह युरोपमध्ये आलेली लाट या कारणांनी रुपयाची घसरण झाली.

सलग चौथ्यादिवशी रुपयाच्या मूल्यात आज घसरण झाली आहे. आठवडाभरात रुपयाच्या मूल्यात ४९ पैशांची घसरण झाली आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत २३ पैशांनी घसरून ७४.१० रुपये झाले आहे. बुधवारी रुपयाच्या मूल्य १६ पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत ७३.८७ रुपये झाले होते.

या कारणाने रुपयाची घसरण-

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांमध्ये टाळेबंदी लागू केली आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यपदाच्या निवडणुकीमुळे जागतिक बाजारात अनिश्चितता असल्याचे मिलवूड केन इंटरनॅशनलचे संस्थापक निश भट्ट यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई शेअर बाजार निर्देशांक १७२.६१ अंशाने घसरून ३९,७४९.८५ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ११,६७०.८० वर स्थिरावला.

ABOUT THE AUTHOR

...view details