मुंबई- डॉलरच्या तुलनेत १६ पैशांची घसरण होवून रुपया ७१.३८ वर पोहोचला आहे. खनिज तेलाचे वाढलेले दर आणि जगभरातील चलनाच्या तुलनेत बळकट झालेला डॉलर यामुळे रुपयाची घसरण झाली आहे.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केट खुले होताना रुपया डॉलरच्या तुलनेत घसरून ७१.२७ वर पोहोचला. तर बाजार बंद होण्यापूर्वी रुपया डॉलरच्या तुलनेत १६ पैशांनी घसरून ७१.३८ वर पोहोचला.
संबंधित बातमी वाचा-रुपयाची डॉलरच्या तुलनेत वर्षभरात १५९ पैशांची घसरण
खनिज तेलाचे दर वाढल्याने रुपयाची घसरण झाली आहे. मात्र देशातील भांडवली बाजार बळकट असल्याने रुपयाची आणखी होवू शकणारी घसरण टळल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
हेही वाचा-निफ्टीचा विक्रमी १२,२८२ निर्देशांक! ३२० अंशाने वधारला शेअर बाजार निर्देशांक
खनिज तेलाच्या जागतिक बाजारपेठेत प्रति बॅरलची किंमत ०.५० टक्क्यांनी वाढून ६६.३३ डॉलर झाली आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी ६८८.७६ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याचे शेअर बाजाराच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
हेही वाचा-ट्रायची प्रेक्षकांना नववर्षाची भेट : कमी पैशात दिसणार जादा प्रसारण वाहिन्या