महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

डॉलरच्या तुलनेत रुपया ४८ पैशांनी वधारला; आरबीआयच्या आर्थिक सुधारणेच्या घोषणांचा परिणाम

आठवडाभरात रुपयाची डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी घसरण झाली आहे. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत गुरुवारी सर्वात कमी म्हणजे ७६.८७ रुपये मूल्य होते.

रुपयाचे मूल्य
रुपयाचे मूल्य

By

Published : Apr 17, 2020, 9:07 PM IST

मुंबई- आरबीआयच्या आर्थिक सुधारणांचा भारतीय चलनाच्या मुल्यावर सकारात्मक परिणाम झाला. सतत घसरण सुरू असलेल्या रुपया डॉलरच्या तुलनेत ४८ पैशांनी वधारला. त्यामुळे एका डॉलरसाठी ७६.३९ पैसे मोजावे लागणार आहेत. रुपयाची गुरुवारी ऐतिहासिक घसरण झाली होती.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज खुले होताना रुपयाचे मूल्य एका डॉलरच्या तुलनेत ७६.५९ रुपये होते. त्यानंतर दिवसाखेर रुपया डॉलरच्या तुलनेत ४८ पैशांनी वधारला.

हेही वाचा-शेअर बाजार गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.८३ लाख कोटींची वाढ, 'हे' आहे कारण

भारतीय रिझर्व्ह बँकेने नाबार्ड, सिडबी, एनएचबी यांना ५० हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. तसेच रिव्हर्स रेपो दर हा २५ बेसिस पाईंटने कमी केला आहे. त्यामुळे बँकांना उत्पादक क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. आरबीआयने आर्थिक सुधारणा जाहीर केल्याने रुपयाचे मूल्य बळकट झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोशधक विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी सांगितले.

हेही वाचा- कोरोनानंतरचे जग कसे असेल? मुख्य अर्थसल्लागारांनी व्यक्त केली 'ही' शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details