मुंबई - इराणचे टॉप कमांडर कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर जगभरातील शेअर बाजाराला फटका बसला आहे. रुपयाचीही डॉलरच्या तुलनेत ४२ पैशांनी घसरण झाली आहे. ही गेल्या एक ते दीड महिन्यातील एका दिवसातील रुपयाची सर्वात निचांकी घसरण आहे.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंज खुला होताना रुपया ७१.५६ वर पोहोचला. त्यानंतर डॉलरच्या तुलनेत घसरण होवून रुपया ७१.८१ वर पोहोचला. शेवटी रुपया डॉलरच्या तुलनेत ७१.८० वर स्थिरावला. रुपयाची डॉलरच्या तुलनेत १६ पैशांची गुरुवारी घसरण होवून ७१.३८ वर स्थिरावला होता. अमेरिका-इराणमधील तणावामुळे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरल हे ४.२४ टक्क्यांनी वधारले आहेत. प्रति बॅरलची किंमत ही ६९.०६ डॉलर झाली आहे. आठवडाभरात रुपयाची डॉलरच्या तुलनेत ४५ पैशांनी घसरण झाली आहे.