नवी दिल्ली- वर्षाखेरच्या दिवशी आज रुपयाची डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरण झाली. वर्षभरात रुपयाची डॉलरची तुलनेत १५९ पैशांनी म्हणजे २ रुपये २८ पैशांनी घसरण झाली आहे.
अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्धामुळे रुपयाच्या मूल्याला फटका बसला. खनिज तेलाच्या गरजेसाठी भारत बहुतांश आयातीवर अवलंबून राहतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढल्यानेही रुपयाची घसरण झाली.
हेही वाचा-'या' स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅपची सुविधा १ जानेवारीपासून होणार बंद
गतवर्षी ३१ डिसेंबरला रुपया हा डॉलरच्या तुलनेत ६९.७७ रुपये होता. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात रुपया हा डॉलरच्या तुलनेत २.२० टक्के कमकुवत झाला आहे. तर २०१८ मध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमकुवत झाला होता. वर्ष २०१८ मध्ये खनिज तेलाच्या दरात वाढ झाल्याने देशाच्या आयातीच्या खर्चात वाढ झाली होती. सोन्याच्या वाढत्या किमतीचाही रुपयाला फटका बसल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी सांगितले.
हेही वाचा-'ही' सुविधा न दिल्यास कंपन्यांना रोज द्यावा लागणार ५ हजारांचा दंड