महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

रिलायन्सच्या भांडवली मूल्याने ओलांडला २०० अब्ज डॉलरचा टप्पा; शेअरची किंमत वाढल्याचा परिणाम - Reliance retail news

गतवर्षीच्या तुलनेत रिलायन्सच्या शेअरच्या किमतीमध्ये ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिटेल उद्योगातील २० अब्ज डॉलरचे शेअर खरेदी करण्याचा अ‌‌‌‌ॅमेझॉनला प्रस्ताव दिला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज
रिलायन्स इंडस्ट्रीज

By

Published : Sep 10, 2020, 6:17 PM IST

Updated : Sep 10, 2020, 7:18 PM IST

हैदराबाद- रिलायन्स इंडस्ट्रीजने भांडवली मूल्यात मैलाचा दगड गाठला आहे. रिलायन्सचे एकूण भांडवली मूल्य २०० अब्ज डॉलर झाले आहे. एवढे भांडवली मूल्य असलेली रिलायन्स ही देशातील एकमेव कंपनी आहे. रिलायन्सचे शेअरची किंमत वाढून प्रति शेअर २ हजार ३४४ रुपये झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या भांडवली मूल्यात वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत रिलायन्सच्या शेअरच्या किमतीमध्ये ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिटेल उद्योगातील २० अब्ज डॉलरचे शेअर खरेदी करण्याचा अॅमेझॉनला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानंतर रिलायन्सच्या शेअरची किंमत ७.३ टक्क्यांनी वाढून २ हजार ३१९ रुपये झाली आहे. यापूर्वीच अॅमेझॉन कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये गुंतवणुकीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर चर्चा करत आहे.

दरम्यान, रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक पार्टनरने साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. अमेरिकेतील केकेआर आणि को. आणि एल. कॅटरटोन कंपनीही रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करणार असल्याची चर्चा आहे. रिलायन्स जिओमध्ये २० अब्ज डॉलरची विविध तंत्रज्ञान कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यामध्ये गुगलसह फेसबुक कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर कंपनीने रिटेल उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे. महिनाभरापूर्वीच किशोर बियाणी यांची मालकी असलेल्या फ्युचअर रिटेलची रिलायन्सने २४ हजार ७१३ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. त्यानंतर रिलायन्स ही देशातील रिटेल उद्योगात आघाडीची कंपनी ठरली आहे.

Last Updated : Sep 10, 2020, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details