महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

महामारीतही रिलायन्सच्या शेअरची तेजी; पहिल्यांदाच मिळाली 2 हजारांहून अधिक किंमत - रिलायन्स शेअर किंमत न्यूज

गेल्या तीन महिन्यांत रिलायन्सच्या शेअरची किंमत 48 टक्क्यांनी वाढली आहे. फेसबुक, गुगलसह इतर जागतिक कंपन्यांनी रिलायन्सची मालकी असलेल्या जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार रिलायन्सच्या शेअरची खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवित आहेत.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jul 22, 2020, 6:44 PM IST

मुंबई – कोरोना महामारीत उद्योगांसाठी प्रतिकूल वातावरण असतानाही रिलायन्सच्या यशाची घौडदौड सुरुच आहे. रिलायन्सच्या शेअरच्या किमतीने आज नवा उच्चांक गाठला आहे. रिलायन्सच्या प्रति शेअरची किंमत प्रथमच 2 हजारांहून अधिक झाली आहे.

रिलायन्सचे शेअर वधारून प्रति शेअर हे 2 हजार 10 रुपये झाले आहेत. शेअर बाजार बंद होताना रिलायन्सच्या शेअरची किंमत 2 हजार 4 रुपये 10 पैसे होते. हा शेअरचा दर मागील सत्राहून 32.25 रुपयांनी अधिक आहे.

गेल्या तीन महिन्यांत रिलायन्सच्या शेअरची किंमत 48 टक्क्यांनी वाढली आहे. फेसबुक, गुगलसह इतर जागतिक कंपन्यांनी रिलायन्सची मालकी असलेल्या जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार रिलायन्सच्या शेअरची खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवित आहेत.

जिओमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक

गेल्या तीन महिन्यांत जिओमध्ये विविध कंपन्यांनी 1 लाख 52 हजार 56 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर गुगलने जिओमध्ये 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून एप्रिल ते जुनच्या तिमाहीच्या वित्तीय कामगिरीची आकडेवारी 30 जुलै 2020 ला जाहीर करण्यात येणार आहे. ही माहिती रिलायन्सने शेअर बाजाराला दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details