महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अर्थव्यवस्थेची विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर भिस्त; भारतीय भांडवली बाजाराला बसत आहेत धक्के - Share market

भारताची विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील (एफपीआय) निर्भरता वाढली आहे. एफपीआयच्या निधीचे प्रमाण अस्थिर असल्याचे इंडियन रेटिंग पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे विनिमय दर हा अस्थिर होत असून सर्व अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.

प्रतिकात्मक - एफपीआय पैसा

By

Published : Sep 7, 2019, 8:07 PM IST

मुंबई- विदेशी गुंतवणूकदार संस्थांना (एफपीआय) भारतीय अर्थव्यवस्था खुली केली तेव्हापासून हे प्रमाण वाढत गेले आहे. एफपीआयचा निधी येत असल्याने शेअर बाजाराने अनेक विक्रम केले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते एफपीआयवर भारताची भिस्त राहिल्याने अर्थव्यवस्थेला व्यापारी युद्धासारखे धक्के बसत आहेत.

भारताची विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील (एफपीआय) निर्भरता वाढली आहे. एफपीआयच्या निधीचे प्रमाण अस्थिर असल्याचे इंडियन रेटिंग पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे विनिमय दर हा अस्थिर होत असून सर्व अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. निवडणुकीनंतर एफपीआयची भांडवली बाजारामध्ये घाई दिसून आली. शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशांकाने राजकीय स्थिरतेनंतर मे महिन्यात उच्चांक नोंदविला. यावेळी एफपीआयने भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. एफपीआचा पैसा कमी-जास्त होत असताना अर्थव्यवस्थेवर सकारात्मक व परिणाम होत आहे.

हेही वाचा-अनवाणी पायाने शिक्षण ते रॉकेट मॅन; 'अशी' आहे इस्त्रोच्या संचालकांची प्रेरणादायी झेप


गतवर्षी एफपीआयने ऑक्टोबरमध्ये १६ अब्ज डॉलर भांडवली बाजारामधून काढून घेतले आहेत. रुपया एप्रिल २०१८ मध्ये डॉलरच्या तुलनेत ६६.७८ असताना त्याचे मूल्य हे सध्या ७३.३७ एवढे झाले आहे. तज्ज्ञांच्या मते विदेशी गुंतवणूकदारांचा निधीचा शेअर बाजारात परिणाम होतो. तसेच चलन बाजारपेठ ही विदेशी गुंतवणुकदारांच्या निधीने निश्चित होते.

हेही वाचा-'हुवाईचा ५ जी मध्ये समावेश करताना योग्य विचार करायला हवा'

अमेरिका-चीनमध्ये व्यापार युद्ध असताना त्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर होतो. त्यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर अधिक परिमाण होवून अधिकच बिकट परिस्थिती होते. एकंदरीत एफपीआय हे भारतीय अर्थव्यवस्थेला ढवळून काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा-देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करण्याकरिता 'हा' ठरू शकतो मास्टरस्ट्रोक

ABOUT THE AUTHOR

...view details