नवी दिल्ली- चिनी स्मार्टफोन कंपनी रिअलमीने देशातील पहिला ५ जी स्मार्टफोन लाँच केला आहे. 'एक्स ५० प्रो ५जी' असे या मॉडेलचे नाव आहे. याची भारतात ३७,९९९ रुपये किंमत आहे.
रिअलमीने ५ जी स्मार्टफोन हे दोन रंगांमध्ये आणि तीन श्रेणीत उपलब्ध केले आहेत. ३७,९९९ रुपये (६जी +१२८जीबी), ३९,९९रुपये (जीबी+१२८जीबी) आणि ४४,९९ रुपये (१२ जीबी+२५६जीबी) हे मॉडेल फ्लिपकार्ट आणि रिअलमीवर सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत.
स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचचा सुपर -एएमओएलईडी डिसप्ले आहे. त्यामध्ये मोबाईलच्या तुलनेत ९२ टक्के स्क्रीन आहे. फोनमध्ये क्वालकोम्न स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आहे. त्याबरोबर अॅ़ड्रेनो ६५० जीपीयू व अँडाईड १० वर चालणारा रिअलमी यूआय आहे.
हेही वाचा-शेअर बाजारात ८०७ अंशांनी पडझड; कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने गुंतवणूकदार चिंतेत