महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बाजारातील चढ-उतारावर सेबीने 'ही' दिली प्रतिक्रिया - सेबी

कोरोनाच्या धसक्याने जगभरातील शेअर बाजारासह देशातील शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून आर्थिक मंदीची भीती आणि खनिज तेलाचे दर घसरत असल्याचे सेबीने म्हटले आहे.

सेबी
सेबी

By

Published : Mar 13, 2020, 1:49 PM IST

नवी दिल्ली - शेअर बाजार सकाळच्या सत्रात ३,९०० अंशांनी घसरल्यानंतर शेअर बाजार सावरला आहे. जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा बाजारातील चढ-उतारावर कार्यवाही करण्यासाठी तयार आहोत, अशी सेबीने भूमिका स्पष्ट केली आहे.

कोरोनाच्या धसक्याने जगभरातील शेअर बाजारासह देशातील शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून आर्थिक मंदीची भीती आणि खनिज तेलाचे दर घसरत असल्याचे सेबीने म्हटले आहे.

हेही वाचा-बाजार गुंतवणूकदारांनी गमाविले सुमारे १२ लाख कोटी रुपये

योग्य अशी कार्यवाही करण्यासाठी सेबी आणि शेअर बाजार तयार असल्याचे सेबीने म्हटले आहे. देशातील शेअर बाजाराची घसरण इतर देशांच्या शेअर बाजारांहून लक्षणीयरित्या कमी असल्याचेही सेबीने म्हटले आहे. सेबी ही भांडवली बाजाराचे नियमन करणारी सरकारी संस्था आहे.

हेही वाचा-गुगलच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; सर्वांना 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details