महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'ओप्पो रेनो 4 प्रो'चे भारतात लाॅंचिग; 'ही' आहेत वैशिष्ट्ये - price & features of OPPO Reno 4 Pro

क्वाड कॅमेरेचा सेटअप असलेल्या ओप्पो रेनो 4 प्रोची किंमत भारतात 34 हजार 990 रुपये आहे.

ओप्पो रेनो 4 प्रो
ओप्पो रेनो 4 प्रो

By

Published : Aug 1, 2020, 4:00 PM IST

नवी दिल्ली -- रेनो श्रेणीमधील नव्या मॉडेलचे लॉंचिंग करण्यात आल्याची माहिती ओप्पो इंडियाने ट्विटमधून दिली आहे. रेनो 4 प्रो असे या मॉडेलचे नाव आहे.

ओप्पो रेनो 4 प्रोमध्ये पाठीमागे चार कॅमेरे आहेत. तर4000 एमएचची दणकट बॅटरी आहे. 6.5 इंचचा सुपर एमओएलईडी आहे. या मॉडेलची पाच ऑगस्टपासून विक्री सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन पाच ते सात ऑगस्टपर्यंत खरेदी केल्यानंतर ओप्पो स्मार्टवॉचच्या खरेदीवर 2 हजारांची सवलत मिळणार आहे. क्वाड कॅमेरेचा सेटअप असलेल्या ओप्पो रेनो 4 प्रोची किंमत भारतात 34 हजार 990 रुपये आहे.

ओप्पो पहिल्यांदाच स्मार्टवॉच लाॅंच करत आहे. स्मार्टवाॅचला थ्रीडी लवचिक असा दोन्ही बाजूला डिसप्ले आहे. त्याला गुगलच्या वेअर या ऑपरेटिंग सिस्टिमचा सपोर्ट आहे. हे स्मार्टवॉच 10 ऑगस्टला 19 हजार 990 रुपये व 14 हजार 990 रुपये अशा दोन श्रेणीमध्ये उपलब्ध होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details