नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या पहिल्या सात दिवसातच पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा डोंब उसळला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या सात दिवसात पेट्रोल एकूण ६० पैशांनी महागले आहे. तर डिझेल ८३ पैशांनी महागले आहे.
गेल्या काही दिवसांप्रमाणे सुरू राहिलेली तेलइंधनाची दरवाढ आजही सुरू राहिली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरात पेट्रोल प्रति लिटर ५ पैशांनी तर डिझेल १२ पैशांनी महागले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल सर्वात महाग प्रति लिटर ८१.३३ रुपये दराने विकण्यात येत आहे. तर चेन्नईत डिझेल सर्वात महाग ७२.६९ रुपये प्रति लिटर दराने विकण्यात येत आहे.
हेही वाचा-शेअर बाजारातील फटका; गुंतवणूकदारांनी गमाविले ३ लाख कोटी रुपये
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटच्या आकडेवारीनुसार दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७५.८४ रुपये आहे. तर कोलकात्यात ७८.३३ रुपये, मुंबईत ८१.३३ रुपये आणि चेन्नईत ७८.६९ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत डिझेल प्रति लिटर ६८.७९, कोलकात्यात ७२.१४, मुंबईत ७१.१५ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत ७२.६९ रुपये प्रति लिटर डिझेलचा दर आहे.
हेही वाचा-बीएस-६ इंजिनक्षमतेच्या इनोव्हा क्रिस्टाचे बुकिंग सुरू; 'ही' आहेत फीचर्स
कच्च्या तेलाचे दर जागतिक बाजारपेठेत सोमवारी ७० डॉलरहून अधिक झाले. अमेरिका-इराणमधील वादामुळे मध्यपूर्वेत तणावाची स्थिती झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. सरकारी खनिज तेल विपणन कंपन्यांकडून कच्च्या तेलाच्या किमतीचा रोज आढावा घेतला जातो. कंपन्यांनी बदलले पेट्रोल-डिझेलचे दर सकाळी सहा वाजल्यापासून देशभरातील सर्व पेट्रोल पंपावर लागू होतात