महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पुण्यात दोन वर्षानंतर पुन्हा पेट्रोलचे दर नव्वदीत; नागरिकांच्या खिशाला कात्री - पुणे पेट्रोल दर न्यूज

पेट्रोलच्या दरात गेल्या दोन आठवड्यांमध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेलच्या किमतीतही मोठी वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 90 रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 79 रुपयांवर पोहोचले आहेत.

पेट्रोल पंप
पेट्रोल पंप

By

Published : Dec 8, 2020, 6:47 PM IST

Updated : Dec 8, 2020, 7:02 PM IST

पुणे- गेल्या पंधरा दिवसांपासून देशभरात पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. पुणे शहरात पेट्रोलचे दर पुन्हा 90 रुपयांवर गेले आहेत. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये शहरात पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली होती.

पेट्रोलच्या दरात गेल्या दोन आठवड्यांमध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेलच्या किमतीतही मोठी वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 90 रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 79 रुपयांवर पोहोचले आहेत.

पुण्यात दोन वर्षानंतर पुन्हा पेट्रोलचे दर नव्वदीत

हेही वाचा-जिओ ५जी सेवा पुढील वर्षी सुरू करणार -मुकेश अंबानी

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोलच्या दरात वाढ-

  • शहरात पेट्रोलचे दर नव्वदी पार गेले असले तरी काही पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय बाजार हे कारण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
  • जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलमध्ये वाढ झाली असेल म्हणून पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याचे एका नागरिकाने म्हटले आहे. जेवढे काम आहे, तेवढेच पेट्रोल टाकतो अशी प्रतिक्रिया काही पुणेकरांनी दिली.
  • एक तरुणाने थेट आता सायकल चालवली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा-कराड जनता बँकेचा परवाना रद्द; आरबीआयची कारवाई

टाळेबंदीत पेट्रोलचे दर काही प्रमाणात स्थिर

टाळेबंदीच्या काळात पेट्रोलचे दर काही प्रमाणात स्थिर होते. मात्र गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्याने इंधनाच्या दरामध्ये हळूहळू वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दराचा आढावा घेतला जातो. त्या किमतीप्रमाणे देशात पेट्रोल-डिझेलचे किरकोळ विक्रीतील दर जाहीर करण्यात येतात.

Last Updated : Dec 8, 2020, 7:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details