नवी दिल्ली- गेल्या नऊ दिवसात आठव्यांदा पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोलच्या किमती शनिवारी दिल्लीत प्रति लिटर ८२ रुपयांहून अधिक आहेत. तर डिझेलच्या किमती प्रति लिटर ७२ रुपये आहेत.
दिल्लीत पेट्रोलच्या किमती प्रति लिटर २४ पैशांनी वाढल्या आहेत. तर डिझेलच्या किमती २७ पैसे प्रति लिटर वाढल्या आहेत. कोरोनावर लस येण्याची आशा असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.
- सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८२.१३ रुपये आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७२.१३ रुपये आहे.
- पेट्रोल-डिझेलच्या किमती २० नोव्हेंबरपासून आठव्यांदा वाढल्या आहेत.
- गेल्या नऊ दिवसात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १.०७ रुपयाने वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर १.६७ रुपयाने वाढ झाली आहे.