महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पेट्रोलच्या किमतीचा दोन वर्षातील उच्चांक; दिल्लीत प्रति लिटर ८३ रुपये! - Petrol rate update news

सरकारी तेल कंपन्यांनी २० नोव्हेंबरनंतर तेराव्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर आज वाढविले आहेत. या १६ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर २.०७ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर २.८६ रुपये आहेत.

पेट्रोलचा दर
पेट्रोलचा दर

By

Published : Dec 5, 2020, 4:42 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोलच्या किमती दोन वर्षात पहिल्यांदाच दिल्लीत प्रति लिटर ८३ रुपयांहून अधिक झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात पेट्रोलचे दर तेराव्यांदा सरकारी तेल कंपन्यांनी वाढविले आहेत.

पेट्रोलचे दर शनिवारी प्रति लिटर २७ पैसे तर डिझेलचे दर २५ पैसे असे सरकारी कंपन्यांकडून वाढविण्यात आले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८२.८६ रुपयांवरून ८३.१३ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ७३.३२ रुपयांवरून ७३.०७ रुपये आहे. हे पेट्रोल व डिझेलचे दर सप्टेंबर २०१८ नंतर सर्वाधिक आहे.

हेही वाचा-यवतमाळच्या सुताला चीनसह हाँगकाँगमधून मागणी; कोरोनासह मंदीतही बाबासाहेब नाईक सूतगिरणीची कामगिरी

  • सरकारी तेल कंपन्यांनी २० नोव्हेंबरनंतर तेराव्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर आज वाढविले आहेत. या १६ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर २.०७ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर २.८६ रुपये आहेत.
  • कोरोनावरील लस तयार होण्याच्या आशेने कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याचे आयसीआयसीआय सेक्युरिटीज म्हटले आहे.
  • युरोप आणि अमेरिकेमध्ये कोरोनाची दुसरी लाट असतानाही कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.
  • बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचा दर ३० ऑक्टोबरला प्रति बॅरल ३६.९ डॉलर होता. हे दर वाढून ४ डिसेंबरला प्रति बॅरल ४९.५ डॉलर राहिले आहेत.

हेही वाचा-चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर उणे १० टक्के होण्याची शक्यता-अभिजीत सेन

दरम्यान, कोरोना महामारीत कच्च्या तेलाचे दर घसरले होते. कोरोना महामारीतून जग बाहेर पडण्याच्या शक्यतेने जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details