नवी दिल्ली- इंधनाच्या दरवाढीला सलग दुसऱ्या दिवशी ब्रेक मिळाला आहे. पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर ९०.५९ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ८०.९७ रुपये आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर शनिवारपर्यंत सलग १२ दिवस वधारले होते.
पेट्रोल व डिझेलचे दर शनिवारपर्यंत सलग १२ दिवस वधारले होते. देशात पेट्रोलचे दर ९ फेब्रुवारीपासून प्रति लिटर ३.६३ रुपयांनी वाढले होते. तर डिझेलचे दर प्रति लिटर ३.८४ रुपयांनी वाढले होते. या दरवाढीनंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा-ग्रामीण भागात सेतू सुविधा केंद्रावर मिळणार इलेक्ट्रिक वाहने
- मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ९० रुपये आहे.
- देशातील बहुतांश सर्व महानगरांमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ९० रुपयांहून अधिक आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८० रुपयांहून अधिक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशसह काही राज्यांमध्ये प्रिमियम पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत.
- जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६३ डॉलर आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाचे दर आणखी वाढू शकतात, असे सरकारी तेल विपणन कंपनीमधील अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हेही वाचा-आरबीआयचे डेक्कन अर्बन बँकेवर निर्बंध; केवळ हजार रुपये काढता येणार
या कारणाने वाढले कच्च्या तेलाचे दर-
- कोरोनाच्या संकटामधून जगभरातील अर्थव्यवस्था सावरत असताना कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे.
- सौदी अरेबियाने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठ्याचे प्रमाण कमी झाले आहे.