नवी दिल्ली - नव्या वर्षात सलग सहा दिवस पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आज दरवाढीला ब्रेक लागला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवारच्या दराएवढेच म्हणजे स्थिर राहिले आहेत.
देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले असले तरी जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीआहे.
हेही वाचा-महागाईचा डोंब; सात दिवसात पेट्रोल ६० पैशांनी तर डिझेल ८३ पैशांनी महाग
असे आहेत पेट्रोल-डिझेलचे दर -
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटच्या आकडेवारीनुसार दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७५.८४ रुपये आहे. तर कोलकात्यात ७८.३३ रुपये, मुंबईत ८१.३३ रुपये आणि चेन्नईत ७८.६९ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत डिझेल प्रति लिटर ६८.७९, कोलकात्यात ७२.१४, मुंबईत ७१.१५ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत ७२.६९ रुपये प्रति लिटर डिझेलचा दर आहे.
हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा झटका; विकासदर ५ टक्के राहण्याचा अंदाज
कच्च्या तेलाचे दर वाढून प्रति बॅरल ७१.२८ डॉलर एवढी झाली आहे. यापूर्वी १६ सप्टेंबरला कच्च्या तेलाच्या किंमत प्रति बॅरल ७१.९५ डॉलर एवढी झाली होती.