नवी दिल्ली- देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका आजही सुरुच आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रति लिटर ३० पैशांनी तर डिझेलचे दर २५ पैशांनी वाढविले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८७.६० रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ७७.६७ रुपये आहेत.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६१ डॉलरहून अधिक झाले आहेत. त्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनीही देशातील पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले आहेत.
हेही वाचा-महाराष्ट्रातील २ हजार १४ गावे अजूनही वेगवान इंटरनेटपासून वंचित
- विविध राज्यांकडून पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे प्रमाण भिन्न आहे. त्यामुळे विविध राज्यांत पेट्रोल आणि डिझेलचे दर भिन्न आहेत.
- मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ९४.१२ रुपये आहे. तर डिझेलही मुंबईत महागले आहे.
- मुंबईत ग्राहकांना प्रति लिटर डिझेलसाठी ८४.६३ रुपये मोजावे लागत आहेत.
- सौदी अरेबियाने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.
- २०२१ मध्ये पेट्रोलचे दर चौदा वेळ वाढविल्याने पेट्रोल ३.८९ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलचे दर २०२१ मध्ये प्रति लिटर ३.८६ रुपयांनी वाढले आहेत.
हेही वाचा-सोन्याच्या किमतीत प्रति तोळा ४९५ रुपयांची वाढ
सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना सरकारी तेल कंपन्यांकडून नुकसान टाळण्याकरिता इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांवर बसलेला असताना इंधनाची दरवाढ सुरू असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.