नवी दिल्ली - नववर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी खनिज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. पेट्रोलचे दर बहुतांश शहरात ८ ते ११ पैशांनी आणि डिझेलचे दर ११ ते १४ पैशांनी वाढले आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर हा ७५.२५ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ६८.१० रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर ७७.२७ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर हा ७०.४९ रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ७०.८७ रुपये तर डिझेल प्रति लिटर ७१.८९ रुपये आहे.