महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेल भडकण्यास सुरुवात; जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरवाढीचा फटका - जागतिक बाजारपेठ

रुपयाची झालेली घसरण आणि कच्च्या तेलाचे वाढलेले दर याचा दुहेरी फटका सरकारी तेल कंपन्यांना बसत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे वाढविले आहेत.

प्रतिकात्मक- पेट्रोल-डिझेल

By

Published : Sep 17, 2019, 12:49 PM IST

नवी दिल्ली - ग्राहकांच्या खिशाला खात्री लागणार आहे. कारण सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर १८ पैशांनी तर डिझेलचे दर हे ३३ पैशांनी वाढविले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले आहेत.

सौदी अरेबियाने तेल प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्यानंतर उत्पादन ५० टक्के कमी केले आहे. त्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेल साठ्याची टंचाई निर्माण होईल, या भीतीने दर वाढले आहेत. रुपयाची झालेली घसरण आणि कच्च्या तेलाचे वाढलेले दर याचा दुहेरी फटका सरकारी तेल कंपन्यांना बसत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे वाढविले आहेत.

अ.क्र शहराचे नाव पेट्रोलचा दर (प्रति लिटर)
नवी दिल्ली ७७.२१ रुपये
मुंबई ७७.८३ रुपये
हैदराबाद ७६.६९ रुपये
बंगळुरू ७४.६१ रुपये
चेन्नई ७४.९७ रुपये
अ.क्र शहराचे नाव डिझेलचा दर (प्रति लिटर)
नवी दिल्ली ७७.२१ रुपये
मुंबई ७७.८३ रुपये
हैदराबाद ७६.६९ रुपये
बंगळुरू ७४.६१ रुपये
चेन्नई ७४.९७ रुपये

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय तेल कंपन्या ५ रुपये ते ६ रुपये प्रति लिटरने डिझेलचे दर वाढवितील, अशी शक्यता कोटकने अहवालात व्यक्त केली आहे. सौदीमधील अॅरॅम्को ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची तेल उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने निम्मे उत्पादन घटविले आहे. त्याचा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ग्राहक असलेल्या भारताला फटका बसेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details