महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

इंधनाची दरवाढ सुरुच; मुंबईत डिझेल प्रति लिटर ८३ रुपये - डिझेल दरवाढ न्यूज

दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर ३५ पैशांनी वाढल्या आहेत. तर दिल्लीत दर वाढून पेट्रोल प्रति लिटर ८६.०५ रुपये आहे. तर मुंबईत डिझेल प्रति लिटर ९२.६२ रुपये प्रति लिटर आहे.

इंधन दरवाढ न्यूज
इंधन दरवाढ न्यूज

By

Published : Jan 26, 2021, 3:46 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोलचे दर मंगळवारी वाढून प्रति लिटर ८६ रुपयांहून अधिक झाले आहेत. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ७६ रुपयांहून अधिक आहेत. गतवर्षाच्या तुलनेत हे इंधनाचे दर सर्वाधिकआहेत.

दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर ३५ पैशांनी वाढल्या आहेत. तर दिल्लीत दर वाढून पेट्रोल प्रति लिटर ८६.०५ रुपये आहे. तर मुंबईत डिझेल प्रति लिटर ९२.६२ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत डिझेलचे दर वाढून प्रति लिटर ७६.२३ रुपये आहेत. तर मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर ८६.०३ रुपये आहेत.

मागील आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर एक रुपयाने वाढले आहेत. राज्यांतील स्थानिक करानुसार पेट्रोल-डिझेलचे दर भिन्न आहेत. राज्यांचा व्हॅट आणि केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर आणखी जास्त आहेत.

हेही वाचा-विदेशातील गुंतवणुकीत भारतीय कंपन्यांची ४२ टक्क्यांनी घट

ही आहेत पेट्रोल-डिझेल दरवाढीची कारणे-

  • कोरोना महामारीवर भारतासह विविध देशात लसीकरण मोहिम सुरू आहे. अशा स्थितीत जगभरातून कच्च्या तेलाची मागणी वाढ वाढण्याची चिन्हे आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत.
  • सौदी अरेबियाने कच्च्यात तेलाचे उत्पादन कमी केल्याने दर वाढल्याचे म्हटले होते. सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये रोज १ दशलक्ष बॅरलने उत्पादन कमी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
  • दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांकडून दररोज जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये बदल केले जातात.

हेही वाचा-प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर ग्रीन कर; केंद्राचा प्रस्ताव

ABOUT THE AUTHOR

...view details