महाराष्ट्र

maharashtra

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या काय आहेत दर

By

Published : Oct 17, 2021, 10:03 AM IST

गेल्या दीड महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर आहेत. याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये किंमती पेट्रोलचे दर 111 रुपयांच्या पुढे गेले आहेत.

पेट्रोल आणि डिझेल
HN-NAT-17-10-2021-Petrol and diesel price today 17th october 2021

नवी दिल्ली - देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव थांबायचं नाव घेत नाहीयेत. दररोज इंधनाचे भाव गगनाला भिडत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रविवारीगी वाढले. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 34 पैशांवरून 35 पैशांपर्यंत वाढवल्या आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 105.84 रुपये प्रति लीटर आणि मुंबईत 111.77 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे. त्याचबरोबर मुंबईत आता डिझेल 102.52 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर दिल्लीत डिझेलची किंमत 94.57 रुपये प्रति लीटर आहे.

महत्वाच्या शहरांमधील पट्रोल आणि डिझेलच्या किंमती -

शहर
पेट्रोल
डिझेल
दिल्ली 105.84 94. 57
मुंबई 111.77 102.52
कोलकाता 106.45 97.88
चेन्नई 103.05 98.82

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर सर्व दर जोडल्याने इंधनाची किंमती जवळजवळ दुप्पट होते. देशाला 89 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. म्हणूनच जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीमध्ये चढ-उतार होतो. तेव्हा भारतातील तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होते. तेलाच्या किंमती वाढण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती आणि केंद्र व राज्ये यांच्याकडून उच्च कर दरात वाढ. पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर राज्यात वेगवेगळे असतात.

डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासायची -

पेट्रोल-डिझेलचे दर सकाळी 6 वाजता ते अद्यावत होतात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑईल ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवल्यास माहिती मिळवू शकतात. तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

वाढत्या इंधन दरासाठी जबाबदार कोण?

कोविड संकटाच्या या काळात जणू जखमेवर मीठ चोळण्याचे कामच सध्या होत आहे. पेट्रोलवर मोठा कर लावल्याने जनता अडचणींच्या खोल भोवऱ्यात अडकत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे देशभरात नाराजी आहे. पंतप्रधान मोदींनी एलपीजीला जीएसटी अंतर्गत आणण्याची आपल्या सरकारची बांधिलकी व्यक्त केली. पेट्रोल आणि डिझेलदेखील जीएसटीखाली आणण्याची मागणी संसदेमध्ये होत आहे. 2008 साली जेव्हा कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 150 डॉलर होती, तेव्हा एक लिटर पेट्रोलची किंमत 50 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 35 रुपये होती. आता, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलर्स आहे, तेव्हा इंधनाचे दर उच्चांकी का आहेत?, असा सवाल नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details