नवी दिल्ली- वाहन उद्योगातील मंदीचे सावट वर्षाखेरही कायम राहिले आहे. देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत डिसेंबरमध्ये १.२४ टक्के घसरण झाली आहे. डिसेंबरमध्ये २ लाख ३८ हजार ७५३ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी २ लाख ३५ हजार ७८६ वाहनांची डिसेंबरमध्ये विक्री झाली होती.
देशातील कारच्या विक्रीत ८.४ टक्के घसरण झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये १ लाख ५५ हजार १५९ कारची विक्री झाली होती. डिसेंबर २०१९ मध्ये १ लाख ४२ हजार १२६ कारची विक्री झाली. मोटरसायकलच्या विक्रीतही डिसेंबरमध्ये १२.०१ टक्के घसरण झाली आहे. डिसेंबरमध्ये ६,९७,८१९ मोटरसायकलची विक्री झाली. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये ७,९३,०४२ मोटरसायकलची विक्री झाली होती.