महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नव्या वर्षात कांद्यासह बटाट्याच्या किमती कमी होण्याची शक्यता - कांदा भाव

आझादपूर भाजीमंडई येथील घाऊक विक्रेते अंकित बुद्धीराजा म्हणाले, येत्या दोन महिन्यात कांद्याच्या किमती कमी होणार आहेत. तुर्कीमधील कांदा प्रति किलो ५० ते ६० रुपये दराने विकला जात आहे.

onion market
कांदे बाजारपेठ

By

Published : Dec 28, 2019, 6:17 PM IST

नवी दिल्ली - कांद्यासह पालेभाज्यांची बाजारपेठेत आवक वाढत आहे. त्यामुळे नव्या वर्षात पालेभाजी, कांदे व बटाट्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.


गेल्या काही आठवड्यांपासून कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. किरकोळ बाजारपेठेत कांद्याचा दर प्रति किलो २०० रुपयापर्यंत पोहोचला आहे. तर बटाट्याचा दर प्रति किलो ४० रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा-सरकारी बँका पुन्हा सुस्थितीत; १३ बँकांनी नोंदविला नफा - केंद्रीय वित्त मंत्रालय


आझादपूर भाजीमंडई येथील घाऊक विक्रेते अंकित बुद्धीराजा म्हणाले, येत्या दोन महिन्यात कांद्याच्या किमती कमी होणार आहेत. तुर्कीमधील कांदा प्रति किलो ५० ते ६० रुपये दराने विकला जात आहे. तर देशातील कांदा प्रति किलो ८० ते १०० रुपये दराने विकला जात आहे. जर तुर्कीतील कांदा उपलब्ध झाला नसता तर देशातील कांद्याच्या किमती ३०० ते ४०० रुपयापर्यंत पोहोचल्या असत्या, असे विक्रेत्याने सांगितले.

हेही वाचा-बँकांकडील जप्त मालमत्तेचा होणार ऑनलाईन लिलाव, अर्थमंत्र्यांकडून पोर्टल लाँच


मान्सून हंगामामुळे पालेभाज्यांचे दर वाढल्याचे मुरली यादव या विक्रेत्याने सांगितले. देशाच्या काही बाजारपेठेमध्ये नवा शेतमाल आला आहे. त्यामुळे टोमॅटो, बटाटे, कोबीफ्लॉवर आणि इतर पालेभाज्यांचे दर कमी होणार आहे. दरम्यान, देशातील अनेक भागांत काद्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details