टेक न्यूज - चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी वनप्लसने आता स्मार्टफोन बाजारपेठची समीकरणे बदलली आहेत. सॅमसंग, अॅपल या सारख्या दिग्गज कंपन्यांना वन प्लसने जबरदस्त टक्कर देत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात वनप्लसने आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन 'OnePlus 7T Pro' लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने OnePlus 7T लाँच केला होता.
जाणून घ्या 'OnePlus 7T Pro' ची वैशिष्ट्ये
- Qualcomm Snapdragon 855+ प्रोसेसर
- 'स्मार्ट कर्व्ह्ड डिस्प्ले'
- 'OnePlus 7 Pro' प्रमाणेच यामध्येही 90 Hz रिफ्रेश रेट
- अंदाजे किंमत ५३,९९९
- 8 GB रॅम, २५६ GB इंटरनल स्टोरेज (मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने वाढवता येणार मेमोरी)
- 6.67 इंचीचा Fluid AMOLED (QHD+) डिस्प्ले
- 3120X1440 रिजोल्युशन
- आस्पेक्ट रेशिओ 19.5:9
- 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
- अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर
- Android 10 बेस्ड OxygenOS 10
- बॅटरी 4,085 mAh
- Warp Charge 30T सपोर्ट
- कंपनीनुसार 23 टक्क्याने होणार चार्जिंग फास्ट
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा
- प्रायमरी लेंस 48 मेगापिक्सल (Sony IMX586)
- दुसरा टेलिफोटो लेंस 8 मेगापिक्सल
- तिसरा कॅमेरा अल्ट्रावाईड लेंस 16 मेगापिक्सल
- डुअल एलईडी फ्लॅश
सेल्फी लव्हर्ससाठी खास
- पॉपअप सेल्फी कॅमेरा
- 16 मेगापिक्सल (लेंस Sony IMX471)
- फुल एचडी व्हिडिओ रेकार्डिंग
- फेस अनलॉकसाठी करता येणार वापर