हाँगकाँग- जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. जगाला मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करणाऱ्या सौदी अरेबियाच्या दोन तेल प्रकल्पावर मागील आठवड्यात ड्रोनद्वारे हल्ला झाला. त्याचा परिणाम म्हणून सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे.
कच्च्या तेलाचे दर दर्शविणारा निर्देशांक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट टेक्सास इंटरमिडियिटमध्ये १०.६८ टक्क्यांनी म्हणजे ६०.७१ डॉलरने दर वाढले आहेत. तर ब्रेंच क्रुड म्हणजे जागतिक तेलाची बाजारपेठीचे दर दशर्विणाऱ्या निर्देशांकात ११.७७ टक्क्यांनी म्हणजे ६७.३१ डॉलरपर्यंत दर वाढले आहेत.
ब्रेंटमध्ये कच्च्या तेलाचे दर हे एका बिंदूला २० टक्क्यांनी वाढले होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडियिटमध्ये सुमारे १५ टक्क्यांनी वाढले होते.
हेही वाचा-उर्जा वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या थकबाकीत ५७ टक्क्यांची वाढ; ७३ हजार कोटींहून अधिक बोजा
मध्यपूर्वेत तणावाची स्थिती-
तेहरानचे समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांनी सौदीच्या तेल प्रकल्पावर हल्ला केला. हल्लेखोरांना उत्तर देण्यासाठी अमेरिका सुरक्षितरित्या बंद (लॉक्ड) आणि पूर्ण तयारीनिशी (लोडेड) होती, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी विधान केले. या हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जबाबदार धरले आहे. तसेच इराणवर लष्करी हल्ला करण्याचा इशाराही दिला आहे.