मुंबई- सलग पाचव्या सत्रात निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे. निफ्टीने दिवसाखेर विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे. डेरिटिव्हजची मुदत संपत असताना आणि जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती असतानाही निफ्टीत तेजी दिसून आली आहे.
देशात नवीन कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असताना आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वधारताना गुंतवणुकदारांचा विश्वास वाढल्याचे ट्रेडर्सने सांगितले. निफ्टीचा शेअर बाजार अस्थिर राहिल्यानंतर दिवसाखेर निर्देशांक ३६.४० अंशाने वधारून १५,३३७.८५ वर स्थिरावला. मागील सत्रात निफ्टीचा निर्देशांक १५,३१४.७० वर स्थिरावला होता.
हेही वाचा-पोलिसांकडून धमकाविण्याकरता वापरण्यात येणारी रणनीती चिंताजनक - ट्विटर
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ९७.७० अंशाने वधारून ५१,११५.२२ वर स्थिरावला. बँकिंग, आयटी आणि उर्जा कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.