अबब! भारतात अॅपलच्या 'या' प्रॉडक्टची किंमत चक्क १० लाख
4k आणि 5k रेटिना डिस्प्लेसह अॅपलने आयमॅक प्रो लाँच केला आहे. यामध्ये 2.3GHz चा १८ कोरचा इंटेलचा Xeon W प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह यामध्ये 256 जीबी रॅम आणि Radeon प्रो वेगा 64X ग्राफिक्स आहे.
टेक डेस्क - 4k आणि 5k रेटिना डिस्प्लेसह अॅपलने आयमॅक प्रो लाँच केला आहे. यामध्ये 2.3GHz चा १८ कोरचा इंटेलचा Xeon W प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह यामध्ये 256 जीबी रॅम आणि Radeon प्रो वेगा 64X ग्राफिक्स आहे.
याची किंमत १५,६९९ अमेरिकी डॉलर (भारतीय मूल्यात १०.८४ लाख रुपये) आहे. प्रो Radeon प्रो वेगा 64X व्हेरिएंट तुम्हाला आर्डर करावा लागेल तेव्हाच मिळणार आहे. नवीन आयमॅक प्रो 64 जीबी, 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये मिळणार.
अॅपलने भारतात २ नवे आयमॅक लाँच केले आहेत. यामध्ये एक २१.५ इंचीच्या मॉडलमध्ये 4k रेटिना डिस्प्ले आहे आणि दुसऱ्या २७ इंचीच्या मॉडेलमध्ये 5k रेटिना डिस्प्ले है. यांची किंमत अंदाजे १,१९,००० रुपये आणि १,६९,९०० रुपये आहे. याची विक्री पुढील आठवड्यात अॅपलच्या अधिकृत स्टोरमध्ये होणार आहे, असे समजते.
21.5 इंचीच्या आयमॅकमध्ये 8 व्या जेनरेशनचे क्वॉडकोर आणि हेक्साकोर व्हेरिएंट मिळतील. तर २७ इंचीच्या आयमॅक ९ व्या जेनरेशनमध्ये हेक्साकोर आणि ऑक्टाकोर प्रोसेसरचे व्हेरिएंट मिळणार. पहिल्यांदा अॅपलने आयमॅकमध्ये Radeon प्रो वेगा ग्राफिक्सचा वापर केला आहे. हे दोन्ही आयमॅक मॅकओएस Mojave सह येणार.