महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अ‌ॅपलच्या चाहत्यांकरता खूशखबर! आयफोन एसई देशात होणार असेम्बल - iPhone SE latest news

आयफोन एसईचे असेम्बलिंग हे अ‌ॅपलची पुरवठादार कंपनी विस्ट्रॉनकडून बंगळुरुमधील उत्पादन प्रकल्पात करण्यात येते. एचडीएफसी बँकेकडून असलेल्या कॅशबॅक ऑफरमधून आयफोन एसईची किंमत 38 हजार 900 रुपयांपर्यंत कमी होणार आहे.

आयफोन एसई
आयफोन एसई

By

Published : Aug 24, 2020, 4:27 PM IST

Updated : Aug 24, 2020, 6:24 PM IST

नवी दिल्ली– अ‌ॅपलने परवडणाऱ्या दरात आणि दुसऱ्या पिढीतील असलेल्या आयफोन एसईचे (2020) देशात असेम्बलिंग करण्यास सुरूवात केली आहे. हा आयफोन लवकरच अ‌ॅपलच्या अधिकृत किरकोळ विक्री केंद्रात पोहोचणार आहे. तसेच ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अ‌ॅपलने अँड्राईडच्या मध्यम श्रेणीतील वापरकर्ते व आयफोन विकत घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून देशात नवीन आयफोन एसई असेम्बल करण्यात येत आहे. हा आयफोन एसई हा दिसायला आयफोन 8 सारखा आणि आयफोन 11 ची क्षमता असलेला आहे. देशातील बाजारपेठेत आयफोन एसई हा केवळ 42,500 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

कंपनीने म्हटले, की आयफोन एसईमध्ये आमची सर्वात शक्तीशाली चीप, सर्वात आवडत्या आकारात आणि सर्वात परवडणाऱ्या दरात आहे. भारतामधील ग्राहकांसाठी उत्पादन करताना आम्ही उत्साहित आहोत.

आयफोन एसईचे असेम्बलिंग हे अ‌ॅपलची पुरवठादार कंपनी विस्ट्रॉनकडून बंगळुरुमधील उत्पादन प्रकल्पात करण्यात येते. एचडीएफसी बँकेकडून असलेल्या कॅशबॅक ऑफरमधून आयफोन एसईची किंमत 38 हजार 900 रुपयांपर्यंत कमी होणार आहे.

नुकतेच अ‌ॅपलचे भांडवली मूल्य हे 2 लाख कोटी डॉलरहून अधिक झाले आहे. एवढे भांडवली मूल्य होणारी अॅपल ही अमेरिकेची पहिली कंपनी आहे. कंपनीकडून भारतात आयफोन 11, आयफोन एक्सआर, आयफोन 7 आणि नव्या आयफोन एसईचे असेम्बलिंग करण्यात येत आहे.

Last Updated : Aug 24, 2020, 6:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details