नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांकरिता आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. मात्र, सध्याचे इंधनाचे वाढलेले भरमसाठ पाहता उत्पादन शुल्कातील कपात फारशी नसल्याचे म्हटले जात आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन 5 रुपये तर तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांहून अधिक आहे. गेली काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज प्रति लिटर 35 पैशांनी वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर जनतेसह विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे.
हेही वाचा-विशेष : कर्नाटकातील दिवाळी कशी असते, सांगतायेत पूर्णब्रह्मच्या प्रमुख जयंती कठाळे