जळगाव - टाळेबंदीत अनेक व्यवसायावर परिणाम झाला आहे. असे असले तरी गेल्या दोन महिन्यांत मास्क विक्रीच्या व्यवसायात ३० लाखांची उलाढाल झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात सॅनिटायझर व मास्क हे सध्या गरजेचे ठरत असल्याने बाजारपेठेत हाबदल झाला आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने याबाबत प्रशासनही दक्षता घेत आहे. नागरिकांना मास्क लावण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
हेही वाचा-'भारताचा विकासदर पुन्हा ५ टक्क्यांनी पुढील वर्षात वधारेल'
अशी आहे मास्कची मागणी-
- एन- ९५ मास्कचे दर ८० ते ८०० रुपयांपर्यंत आहेत. कोरोनाच्या वातावरणात सर्वाधिक परिणामकारक अशा एन-९५ या मास्कला नागरिकांकडून पसंती मिळत आहे.
- एन ९५ हे मास्क वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहेत. यात एन ९५ फिल्टर मास्क व सहा लेअर असलेले मास्क सुमारे २५० रुपयांपासून तर ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
- सर्जिकल मास्क हे वापरून फेकता येतात. त्याच्या किंमती कमी असल्याने सर्वसामान्य नागरिक त्याचा वापर करतात.
- कापडी मास्क किंवा सर्जिकल मास्क हे गर्दीच्या ठिकाणी वापरणे योग्य आहे.