नवी दिल्ली- मारुती सुझुकी इंडियाचे शेअर आज २.१९ टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीने नोव्हेंबरमध्ये उत्पादन वाढिल्याने मारुतीच्या शेअरची गुंतवणूकदारांनी खरेदी केली.
मुंबई शेअर बाजारात मारुती सुझुकीचे शेअर २.१९ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे प्रति शेअरची ७ हजार ३२ रुपये ९० पैसे एवढी किंमत झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मारुती सुझुकीचे शेअर हे १.९९ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे प्रति शेअरची किंमत ही ७ हजार २४ रुपये ५ पैसे झाली.
हेही वाचा-'सरकारने दिलासा दिला नाही तर व्होडाफोन-आयडिया होईल बंद'
गेल्या नऊ महिन्यात मागणी घटल्याने मारुती सुझुकीच्या वाहनांची विक्री कमी झाली होती. अशा स्थितीत मारुती सुझुकीने नोव्हेंबरमध्ये वाहनांचे उत्पादन ४.३३ टक्क्यांनी वाढविले. कंपनीने नोव्हेंबरमध्ये एकूण १ लाख ४१ हजार ८३४ वाहनांचे उत्पादन केले. तर गतवर्षी कंपनीने १ लाख ३५ हजार ९४६ वाहनांचे उत्पादन घेतले. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्प तयार करणाऱ्या गटातील दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त
व्होडाफोनच्या शेअरमध्ये ५.६४ टक्क्यांची घसरण
सरकारने दिलासा दिला नाही तर व्होडाफोन आयडिया बंद करावी लागेल, असे व्होडाफोन कंपनीचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांनी ६ डिसेंबरला म्हटले होते. सरकारकडून दिलासा मिळाला नाही तर कंपनीपुढे नादारीच्या (इन्सॉलव्हन्सी) मार्गाचा पर्याय असल्याचे बिर्ला यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडियाला कोट्यवधी रुपये दूरसंचार विभागाला द्यावे लागणार आहेत. शेअर बाजारात सकाळी ११ वाजून १० मिनिटाला व्होडाफोनच्या प्रति शेअरची ६ रुपये ५३ पैसे किंमत होती. तर शुक्रवारी व्होडाफोन आयडियाच्या प्रति शेअरची ७.३१ रुपये किंमत होती.
हेही वाचा-नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला