महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Maruti Suzuki India : मारुती सुझुकी इंडियाच्या फेब्रुवारी महिन्याच्या उत्पादनात वाढ - मारुती सुझुकी फेब्रुवारी

"इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे (shortage of electronic components) महिन्याभरात वाहनांच्या उत्पादनावर किरकोळ परिणाम झाल्याचेही त्यात म्हटले आहे. MSI ने सांगितले की, गेल्या महिन्यात एकूण प्रवासी वाहनांचे उत्पादन 1,65,672 युनिट होते, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 1,65,783 युनिट होते.

Maruti Suzuki
Maruti Suzuki

By

Published : Mar 2, 2022, 1:49 PM IST

नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडियाने ( Maruti Suzuki India ) बुधवारी सांगितले की गेल्या महिन्यात त्यांच्या उत्पादनात किरकोळ वाढ ( marginal increase ) झाली आहे. मारुती सुझुकीचे फेब्रुवारीमध्ये एकूण 1,69,692 युनिट्सचे उत्पादन झाले. तर गेल्या वर्षी 1,68,180 युनिट होते.

"इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे (shortage of electronic components) महिन्याभरात वाहनांच्या उत्पादनावर किरकोळ परिणाम झाला," असेही त्यात म्हटले आहे. MSI ने सांगितले की, गेल्या महिन्यात एकूण प्रवासी वाहनांचे उत्पादन 1,65,672 युनिट होते, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 1,65,783 युनिट होते. ऑल्टो आणि एस-प्रेसो मिनी कारचे उत्पादन गेल्या महिन्यात २४,२८५ युनिट होते. तेच गेल्या वेळेस २८,२१३ युनिट होते. WagonR, Celerio, Ignis, Swift, Baleno आणि Dzire या कॉम्पॅक्ट कारचे उत्पादन मात्र फेब्रुवारी 2021 मध्ये 91,091 युनिट्सवरून 95,968 युनिट्सपर्यंत वाढले, Dmsur MSI ने सांगितले.

युटिलिटी वाहनांचे उत्पादनात वाढ

जिप्सी (Gypsy ), एर्टिगा ( Ertiga ), एस-क्रॉस (S-Cross), विटारा ब्रेझा (Vitara Brezza ) यांचे उत्पादन 2021 ला मार्चमध्ये महिन्यात 32,501 युनिट्सवरून 33,191 युनिट्सपर्यंत वाढले. फेब्रुवारी २०२१ मध्ये १२,०३५ युनिट्सच्या तुलनेत कंपनीने इको व्हॅनच्या उत्पादनात गेल्या महिन्यात ९,१८९ युनिट्सची घट नोंदवली. कंपनीच्या वाहन सुपर कॅरीचे उत्पादन गेल्या महिन्यात ४,०२० युनिट्सपर्यंत वाढले.

हेही वाचा -Skoda Auto India : फेब्रुवारीमध्ये स्कोडाच्या 4,503 युनिट्सची विक्री

ABOUT THE AUTHOR

...view details