नवी दिल्ली- मारुती सुझुकीने २० लाख वाहनांच्या निर्यातीचा आज महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. मारुती कंपनीकडून आर्थिक वर्ष १९८६-८७ पासून वाहनांची निर्यात करण्यात येत आहे.
मारुती सुझुकीने सर्वप्रथम सप्टेंबर १९८७ मध्ये ५०० कार हंगेरीमध्ये निर्यात केल्या होत्या. त्यानंतर कंपनीने आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये १० लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा गाठला आहे. पहिल्या दहा लाख वाहनांच्या टप्प्यात ५० टक्क्यांहून अधिक निर्यात ही युरोपमधील विकसित बाजारपेठांमध्ये करण्यात आली आहे. मारुतीने १० लाख वाहनांच्या निर्यातीचा टप्पा केवळ आठ वर्षात गाठला आहे. त्यासाठी कंपनीने वेगाने लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियामधील वाढणाऱ्या बाजारपेठांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.