नवी दिल्ली– देशातील टाळेबंदी खुली झाल्यानंतरही वाहनांच्या विक्रीत सुधारणा झालेली नाही. जूनमध्ये मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई, टोयोटा आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहनांच्या विक्रीत 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च संस्थेच्या विश्लेषणानुसार मागील वर्षात जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत वाहन विक्रीत 15 टक्के घसरण झाली होती. तर खते, दूरसंचार क्षेत्राने गतवर्षी वृद्धीदर अनुभवला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक वाहन उद्योगावर परिणाम झाल्याचे इंडिया रेटिंग अँड रिसर्चने म्हटले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये वाहनांच्या विक्रीचे प्रमाण खालीलप्रमाणे-
- मारुतीच्या वाहन विक्रीत जूनमध्ये 54 टक्के घसरण झाली आहे.
- ह्युंदाईच्या वाहन विक्रीत 54 टक्के घसरण झाली आहे.
- महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विक्रीत 55 टक्के घसरण झाली आहे.
- टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या वाहन विक्रीत 63 टक्के घसरण झाली आहे.
- एमजी मोटरच्या 2 हजार 12 वाहनांची जूनमध्ये विक्री झाली आहे. एमजी मोटरच्या वाहन विक्रीत वाढ झाली आहे.
- हिरो मोटोकॉर्पच्या वाहन विक्रीत 27 टक्के घसरण झाली आहे.
- टीव्हीएस मोटरच्या वाहन विक्रीत 33 टक्के घसरण झाली आहे.
दरम्यान, गतवर्षी वाहन उद्योगाला मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका बसला होता. यंदा कोरोना आणि टाळेबंदी या कारणांनी वाहन उद्योग अजून संकटात सापडला आहे.