हैदराबाद– भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असल्याचे निफ्टी आणि मुंबई शेअर बाजारात नकारात्मक पडसाद उमटले आहेत. निफ्टीचा निर्देशांक 32 अंशांनी बंद होवून 9,881 अंशांवर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 97 अंशांनी घसरून 33,507 अंशांवर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 32 अंशांनी घसरून 9,881 अंशांवर स्थिरावला.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरून दिवसाखेअर 76.15 रुपये झाले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअरमध्ये 4 टक्के घसरण झाली. मारुतीचे सर्वाधिक 4 टक्क्यांहून अधिक शेअर वधारले. वित्तीय संस्थांमध्ये एचडीएफसी बँक, कोटक बँक, आयटीसीचे शेअर घसरले.
सोन्याचा दर प्रति तोळा 18 रुपयांनी वधारून 48 हजार 220 रुपये झाला आहे. सलग अकराव्या दिवशी पेट्रोल व डिझलचे दर वाढले आहेत.