मुंबई- शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक मंचावरील स्थिती आणि अमेरिकेतील राजकीय अस्थिरतेने गुंतवणूकदार चिंतित झाले आहेत. गुंतवणुकदारांच्या निरुत्साहाने शेअर बाजार निर्देशांक १२२ अंशाने घसरला आहे.
शेअर बाजार निर्देशांक सकाळी ११ वाजून ३५ मिनिटाला १२२.४६ अंशाने घसरून ३८,८६७.२८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ४४.६५ अंशाने घसरून ११,५२६.५५ वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
येस बँक, टाटा मोटर्स, वेदांत, टाटा स्टील, एशियन पेंट्स, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर ३ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
आयटीसी, एनटीपीसी, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एसबीआय, एचसीएल टेक, एचडीएफसी आणि मारुतीचे शेअर हे २ टक्क्यांनी वधारले आहेत.
हेही वाचा-'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्याच्या ईडीच्या याचिकेला नीरव मोदीचा विरोध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकेत होत असलेल्या राजकीय अस्थिरतेने जगभरातील गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत.